अक्कलकोट: महर्षी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील प्रा. मयुर स्वामी यांना राज्यस्तरीय गुरुजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला
आळंदी येथील संत चोखामेळा आरोग्य केंद्र येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे परमपूज्य महंत ह.भ.प. भारत महाराज जाधव यांच्या शुभहस्ते प्रा. स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सचिन पाटील होते ,
प्रा. स्वामी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी व मूल्यवर्धित उपक्रम राबवले आहेत, ते संगीत विशारद असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड देखील रुजवली आहे सध्या ते विद्यापीठाने आयोजित केलेल्या युवा महोत्सव तयारीचा सराव घेत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, पुनम कोकळगी रूपाली शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 11