
सांगोला – फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.बिरासाहेब रुपनर यांच्या ९ व्या पुण्यतिथीनिमित्त फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.बिरासाहेब रुपनर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल बिडवे यांनी केले. आभार विद्या नरोटे यांनी मानले.
Post Views: 16