सोलापूर : आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या दोन मित्रांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्घटना सोलापूर – विजापूर महामार्गावरील हत्तुर ब्रिजजवळ आज मंगळवारी पहाटे दोन वाजता घडली.
अब्दुल रहिमान मौला ढवळगी (वय ४८ वर्ष) आणि राजू इमामसाब शेख (वय ३५ वर्ष, दोघे राहणार सलगर वस्ती, सोलापूर) असे त्या मयत तरुणांची नावे आहेत.
यातील मयत रहिमान ढवळगी व राजू शेख हे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवस साजरा करून ते दोघे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोटर सायकलने सलगर वस्तीकडे परतत असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकी ला जोराची धडक दिली . या अपघातात रहिमान ढवळगी याचा जागीच मृत्यू झाला, तर राजू शेख याला गंभीर अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान थोड्याच वेळेत मृत्यू झाला.या अपघाताची माहिती कळताच श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातात दोन्ही कुटुंबातील कर्ता गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
चौकट –
यातील मयत रहिमान हे फर्निचर चे काम करायचे, रोजगारासाठी पुण्यात राहायला गेले होते. मात्र बकरी ईद साठी ते सोलापूरला आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, चार भाऊ आणि तीन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होते. अशी माहिती नातेवाईकिनी दिली.
चौकट –
मयत राजू शेख हा सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाणी बाटली विक्री करण्याचे काम करायचा . त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 7