सांगोला – उत्कर्ष उच्च माध्यमिक विद्यालय, सांगोला मधील इ.१२ वी वाणिज्य विभागाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून शास्त्र विभागाचा निकाल ९५ टक्के लागला.
यामध्ये शास्त्र विभागातील स्वप्नाली पिसे ९१.३३, जुई केळकर ८६.६७, हिर्णय जाधव ८१.३३ तसेच वाणिज्य विभागातून प्रथमेश कंठीमठ ६८.८३, स्वप्निल तानगावडे ६३.६७, अनिकेत जगदाळे ६१.३३ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापिका डॉ.संजीवनी केळकर, संस्थाध्यक्षा प्रा.निलिमा कुलकर्णी, सचिव वसुंधरा कुलकर्णी, कोशाध्यक्ष डॉ.शालिनी कुलकर्णी, सहसचिव डॉ.केतकी देशपांडे, प्राचार्य सुनील कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
























