सोलापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत महानगरपालिकेच्या कामगाराच्या मुलाने PSI परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल त्याचा जयोस्तुते फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी वैभव बोराडे यांचे अभिनंदन करत त्याच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे कौतुक केले. आर्थिक अडचणींवर मात करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सत्कार प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाजातील युवकांनीही ध्येय निश्चित करून परिश्रमाच्या जोरावर यश मिळवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास जयोस्तुते फाऊंडेशनचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,वेणू नक्का,बसवराज जमखंडी,देवराज देसाई,चंदू यनगंटी,बलराम अल्लोळी,देशमुख,शिवकुमार नक्का आदि मित्र परिवार उपस्थित होते

























