आरळी – अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ प्रशाला आरळी द. या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2026 चा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले.
प्रशालेतील 3 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविले असून प्रथम श्रेणीत 15, द्वितीय श्रेणीत 12 व तृतीय श्रेणी 01 उत्तीर्ण झाला. प्रशालेने सलग चौथ्यांदा 100% निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रथम:– गौरव नागनाथ गामाजी 76.60%
द्वितीय:–विशाखा वैजनाथ निकम 75.60%
तृतीय:– प्रगती विष्णू गोरड 75.20%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचे काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, सचिव, संचालक यांनी अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.
सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक यांचे गौरव प्रशालेच्यावतीने करण्यात आला.

























