अकलुज – गिरझणी ता.माळशिरस येथील साठे वस्ती व हेगडे वस्ती येथे अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेल संदर्भात ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील याचेकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत बोअरमध्ये नवीन मोटार बसवून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करून मोटरीचे पूजन करण्यात आले व पाणी पूजन करण्यात आली.
ग्रामस्थांना पाण्याची सोय करून देणे ही आपली जबाबदारी आहे, आणि पुढेही अशा मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर राहीन असे त्यावेळी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले. त्यावेळी हेगडे वस्ती येथे रस्त्याची पाहणी करून पुढे पंचायत समितीला सूचना देण्यात आले आहेत.
याप्रसंगी .दादासाहेब नामदास,.सागर देशमुख,.शंकर चव्हाण, कृष्णा लावंड पत्रकार .सुभाष साठे, बापू साठे विजय लोखंडे सतीश भिंगारदेवी साधू साठे हमु साठे .मच्छिंद्र हेगडे,अवि साठे आदी गिरझणी ग्रामस्थ उपस्थित होते.


















