अकलूज – येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयात चि. सयाजी राजे संग्रामसिंह मोहिते – पाटील यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी एकूण ७१ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रक्तदान केले.
आरोग्य शिबिरामध्ये 114 विद्यार्थ्यांनी आणि 27 प्राध्यापक वृंद, अशा एकूण 141 जणांनी सहभाग नोंदविला. यामध्ये सी बी सी, सी १९.९, सी १२५, HB१AC, BSL या चाचण्यांचा समावेश होता. सध्याच्या धावत्या जगात प्रत्येकाने आरोग्य तपासणी करून घेणे अत्यावश्यक असल्याने या शिबिराचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. रक्तदात्यांना प्रोत्साहनपर बॅग,साऊंड बॉक्स, हेडफोन यासारख्या भेटवस्तू देण्यात आल्या. यासाठी रेवनील रक्तपेढी, सांगोला यांचे विशेष सहकार्य लाभले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा संदीप कांबळे, प्रा. डी.पी. बरकडे, प्रा. ए. बी.तमनर, श्री. सचिन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य प्रा. रविराज गणेशराव नलावडे, डॉ. वाय. टी. जाधव, श्री. आदित्य माने- पाटील, प्रा. सचिन भोसले, डॉ. बी. ए. शिंदे, प्रा. सचिन मारुती एकतपुरे, प्रा. डी.एस. मेटकरी, आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तथा महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री माननीय श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते- पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील, मा.श्री. अभिजीत रणवरे, सहसचिव मा. श्री.हर्षवर्धन खराडे- पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


















