Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाचे मिलन कल्याणशेट्टी आणि शिवसेनेचे प्रथमेश म्हेत्रे यांच्या विजयाने युवकात उत्साहाचे वातावरण !

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – नगरीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते लोकाच्या मनातील फिक्स नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी तसेच दुधनी नगरीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांच्या विजयाने शहर तालुक्यातील युवकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.अक्कलकोट आणि दुधनी नगराध्यक्षपदी  युवा नेतृत्व निवडून आल्याने या शहरात शहरांच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू युवकांची मोठी फळी निर्माण करणारे भाजपाचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांना मतदारांनी मोठे मताधिक्य देत तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासाची संधी दिली आहे. मिलन कल्याणशेट्टी यांना एकूण मते १४ हजार ८६१ इतकी पडली आहेत. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांना ८ हजार ५५३ मताचे मताधिक्य मिळाले आहे. इतके मताधिक्य आजपर्यंत  कोणत्याच थेट नगराध्यक्षला मिळाले नाही.

मिलन कल्याणशेट्टी यांचा नम्र स्वभाव , मृदूभाषा , सर्वांशी हसत खेळत राहण्याची खिलाडू वृत्ती , हजारो तरुण कार्यकर्त्यांचे जाळे , थेट जनसंपर्क यामुळे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी  यांना मतदारानी भरभरून मतदान केले. नगराध्यक्षपद  निवडणुकीच्या काळात हजारो कार्यकर्त्यांची सोबत मिलन कल्याणशेट्टी यांना मिळाली. तसेच विकासप्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मोठे राजकीय पाठबळ मिलन कल्याणशेट्टी यांना मिळाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी हे तरुण तडफदार नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांची निवड झाल्याने युवा वर्गासह नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्याकडून अक्कलकोट शहर विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

 दुधनी शहराच्या नगराध्यक्षपदी म्हेत्रे घराण्यातील तिसऱ्या पिढीने बाजी मारली आहे. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती , शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना युवा आघाडी जिल्हाप्रमुख , युवानेते प्रथमेश म्हेत्रे यांनी दुधनीच्या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांना एकूण ५ हजार १५७ मते मिळाली.

यामध्ये २ हजार ८६८  मताधिक्य प्रथमेश म्हेत्रे यांना मिळाले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांच्या प्रचंड अशा पाठबळामुळे प्रथमेश म्हेत्रे यांचा विजयाचा मार्ग  सुकार झाला. ज्येष्ठ नेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे पुण्याईमुळे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा विजय होण्यास मदत झाली आहे. युवानेते प्रथमेश म्हेत्रे यांची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांचे पिताश्री ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांचा असणारा मोठा जनसंपर्क , थेट जनतेची संवाद , युवा वर्गाची फळी , मतदारांना आपलेसे करणारा स्वभाव यामुळे प्रथमेश म्हेत्रे यांचा प्रचंड असा विजय झाला. वास्तविक पाहता दुधनीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा उमेदवारांसाठी मोठी ताकद लावली होती.

पण मतदाराने म्हेत्रे घराण्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. दुधनीत शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण सत्ता आली आहे. थेट नगराध्यक्ष सह वीस नगरसेवक विजय झाले आहेत. या पुढील काळात दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे हे नक्कीच विकास कामांसाठी झटतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Post Views: 43
Previous Post

उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

राज – उद्धव ठाकरे एकत्र येताच सोलापुरात जल्लोष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज - उद्धव ठाकरे एकत्र येताच सोलापुरात जल्लोष

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902867

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697