सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागाच्या वतीने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय सीएनसी व व्हीएमसी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटनप्रसंगी अंकुशराव गायकवाड, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.महेश दौंड, मेकॅनिकल विभागप्रमुख
प्रा.संदीप बावचे उपस्थित होते. कार्यशाळेसाठी सेइनुमेरो निर्माण प्रा.लि, पुणेचे सीएनसी तज्ज्ञ प्रदीप पंगारे व व्हीएमसी तज्ज्ञ राहुल लेंडावे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमांतर्गत कंपनीतर्फे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक प्रयोगांसाठी सहा गेज कॉलेजला भेट देण्यात आले. यामध्ये ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संदीप बावचे, प्रा.नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले.