Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद ‘ॲक्शन मोड’वर प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठक

तरुण भारतbyतरुण भारत
July 31, 2026
in solapur
0
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद ‘ॲक्शन मोड’वर प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठक
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता राज्यातील अव्वल जिल्ह्यांच्या बरोबरीने नेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट’ (पीजीआय-डी) निर्देशांकात जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष (डीक्यूसी) बैठका घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
                 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) वेळापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याते अरुण पाटील, शोभा मिसाळ, डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ. गजेंद्र जमादार तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीजीआय-डीच्या निकषांनुसार सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. इतर आघाडीच्या जिल्ह्यांशी तुलना करून उणिवा, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि आगामी काळातील कृती आराखड्यावर सखोल चर्चा झाली.
              यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षा, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (सीपीडी) प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, समुदाय सहभाग आणि शाळा गुणवत्ता तपासणी या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठक घेणे अनिवार्य करण्यात आले असून त्याचा अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा लागणार आहे.
चौकट
यू-डायस प्लस, परख आणि प्रबंध या प्रणालींमध्ये माहिती वेळेत व अचूक भरणे, डेटा पडताळणी, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वंकष मूल्यमापन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी यावरही विशेष भर देण्यात आला.
कोट
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समन्वयाने कार्य करावे
शासनाच्या सर्व शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना दर्जेदार, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 4
Previous Post

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम : पंढरपूर शहरात २ ऑगस्टला प्रभाग सभेचे आयोजन

Next Post

ताडसौंदणे गावच्या विकासासाठी जलतारा प्रकल्पाचे आ.राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ताडसौंदणे गावच्या विकासासाठी जलतारा प्रकल्पाचे आ.राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

ताडसौंदणे गावच्या विकासासाठी जलतारा प्रकल्पाचे आ.राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015855

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!