Sunday, April 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने करणार – अभिजीत बांगर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 14, 2023
in maharashtra
0
दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने करणार – अभिजीत बांगर
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.

दिवा पूर्व आणि पश्चिम येथील उड्डाणपुलाचे काम आणि परिसरातील व्यवस्था यांची पाहणी शुक्रवारी आयुक्त श्री. बांगर यांनी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी आमदार प्रमोद पाटील, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप नगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, दीपक माने आदी अधिकारी उपस्थित होते.

उड्डाणपुलाचे जोड रस्ते आणि गटार यांचे काम पूर्ण झाल्यावर भिंतीचे काम करता येईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करावे. पूलाच्या दोन्ही बाजूंच्या भागात जिथे भूसंपादन पूर्ण झाले आहे तेथील रस्त्याची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावीत. वेगाने काम करताना गुणवत्ता राखली जाणे आवश्यक आहे. त्यात तडजोड करू नये. तसेच, दिवस येथील वर्दळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त काम करण्यावर भर द्यावा, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. दिवा पश्चिम येथील महापालिका शाळा परिसर, गावदेवी मंदिर या पट्ट्यात उड्डाणपूलाची मार्गिका उतरणार आहे. त्या मार्गिकेच्या संपूर्ण भागाची पाहणी आयुक्त श्री. बांगर यांनी केली. रेल्वेचेही उड्डाणपुलासाठी समांतर काम सुरू आहे. त्यांच्या कामाशी समन्वय साधून पूर्व बाजूचे गर्डर लॉन्चिंग आणि डेक स्लॅब ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होऊ शकतील. त्यानुसार नियोजन करावे असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

भूसंपादनाचा शिल्लक विषय मार्गी लावण्यासाठी स्थानिक नागरिक, शहर विकास विभाग यांच्यासह येत्या १५ दिवसांत बैठक आयोजित करण्यात येईल. त्या बैठकीत तोडगा काढून उड्डाणपुलाचे काम अधिकाधिक जलद कसे पूर्ण करता येईल ते पाहू, असे आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

दिवा येथील रेल्वे मार्गावर क्रॉसिंग नं. २९/सी येथील रेल्वे उड्डाणपूलाचा कार्यादेश जून २०१९ रोजी देण्यात आला होता. त्यातील रेल्वेचा स्पॅन ९३.६४ मीटरचा आहे. पश्चिम बाजूची लांबी ३०१ मीटर तर पूर्व बाजूची लांबी ३४४४ मीटर एवढी आहे. रुंदी १४.५० मीटर असून दोन्ही बाजूस पदपथांची व्यवस्था आहे.

रस्त्यासाठी रेल्वेशी चर्चा उड्डाणपूलाच्या पाहणीनंतर, दिवा पूर्व आणि पश्चिम येथील रेल्वेला समांतर असलेल्या कल्याण दिशेकडील कच्च्या रस्त्यांची पाहणी आयुक्त श्री. बांगर यांनी केली. रेल्वेच्या मालमत्तेतील रस्त्याच्या काही भागामुळे येथील काम थांबले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार, अधिक माहिती घेऊन रेल्वेशी संबंधित अधिकारी चर्चा करतील, असे आयुक्तांनी सांगितले.

शिळफाटा ते दिवा येथील पाईपलाईनचे काम सुरू होणार दिवा पूर्व येथील काही भागातील रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, शिळफाटा ते दिवा येथील साडेपाच किमी लांबीच्या ९०० मीटर व्यासाच्या पाईपलाईनचे काम दसऱ्याला सुरू होईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. मुंब्रा देवी रोड, स्टेशन रोड, दिवा सर्कल या भागाची पाहणीही करण्यात आली. काही भागात रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेचे खांब काढण्याबद्दल आयुक्तांनी विद्युत विभागाला निर्देश दिले.

Post Views: 164
Previous Post

नागपूर : गृहपाठासाठी विद्यार्थीनीला अमानुष मारहाण

Next Post

दररोज ५००० आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात यावे – मनुज जिंदल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दररोज ५००० आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात यावे – मनुज जिंदल

दररोज ५००० आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात यावे - मनुज जिंदल

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारले होते आशाताईंचे शिल्प

April 12, 2026

वृद्ध आजोबांची केली प्लॉटवरून ८लाख रुपयांची फसवणूक

April 12, 2026

आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी साकारले होते आशाताईंचे शिल्प

April 12, 2026

अष्टपैलू स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

April 12, 2026

तळ्यात पडून एकाचा मृत्यू

April 12, 2026

उन्हाचा पारा वाढला

April 12, 2026
अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

अक्कलकोटात पाणपोई सापडली नियमांच्या कचाट्यात !

April 12, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय कर्मचारी नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजू पुंजाल

April 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0804350

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697