Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2023
in maharashtra
0
उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. वादाचे म्हणाल, तर अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पण असे नाही की तिथे काही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी होत असतात ते फार अडचणीचे आहे, असे नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादावर बोलताना स्पष्ट केले.

संभाजीनगर-खिंडवाडी येथील छत्रपती शाहू फळे, फुले व भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समोरासमोर काल भिडले. या गोंधळात शिवेंद्रराजे यांनी भूमीपूजनाचा नारळ फोडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर आज हे दोन्ही नेते कराड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. गेली दोन तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या तिघांमध्ये कमरा बंद बैठक सुरू होती. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री कराडमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळीच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळीच कराड येथे पोहोचले होते. सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा उदयनराजे भोसले यांची बैठक घेतली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतही बैठक घेऊन फडणवीस यांनी चर्चा केली. या दोघांशी चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत संयुक्त कमरा बंद बैठक घेतली. ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील या दोन नेत्यांमधील वाद भारतीय जनता पार्टीला परवडणारा नसल्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. साताऱ्याच्या राजकारणात सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस या दोन्ही राजामध्ये मध्यस्थी करून सलोख्याचा तोडगा काय काढणार काय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघातून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना पक्षातील काही नेते कार्यकर्त्याकडूनच व खास करून आमदार सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडूनच तगडा विरोध असल्याने उमेदवार बदलाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने उदयनराजेंच्या बरोबरच आणखी एक उमेदवार शोधण्याची तयारी सुरू करून सावध पावले टाकण्याची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील व विक्रम पावसकर यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबतही कमरा बंद चर्चा झाल्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीला नऊ ते दहा महिने बाकी असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याची चाचणी सुरू झाली असून आज संध्याकाळी दहिवडी येथे होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो असे सूत्राने सांगितले. दरम्यान, मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनावरून काल झालेल्या वादावरून खा. उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ८० व्यक्तींवर कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Post Views: 95
Previous Post

योग दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी नागरिकांच्या आवाजात संघाची प्रार्थना ऐका….

Next Post

तुळजा भवानीला भाविकांकडून भरभरून दान, तब्बल १३ वर्षांनी होतेय मोजदात….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तुळजा भवानीला भाविकांकडून भरभरून दान, तब्बल १३ वर्षांनी होतेय मोजदात….

तुळजा भवानीला भाविकांकडून भरभरून दान, तब्बल १३ वर्षांनी होतेय मोजदात....

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1032464

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!