अक्कलकोट – येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामाला आता वेग आला असून महाद्वार पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विधिवत पार पडले. बसस्थानकाजवळ उभारण्यात येत असलेले हे भव्य मंदिर ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम जानेवारीअखेर पूर्ण होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे अक्कलकोटच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात धार्मिक पर्यटन दिवसेंदिवस वाढत असताना येणाऱ्या भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी २०२३-२४ च्या पर्यटन विकास विभागाच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मल्लिकार्जुन मंदिरासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून सध्या बांधकाम प्रगतिपथावर आहे.
याशिवाय इलेक्ट्रिक कामासाठी स्वतंत्रपणे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर एकूण ७ ते ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
यावेळी ट्रस्टीचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, स्वामीनाथ हिप्परगी, प्रशांत लोकापुरे, विजयकुमार कापसे, राजशेखर नागुरे, आप्पासाहेब पाटील, अपर्णा सिद्धे, सिद्धाराम शिवमूर्ती, सुनील सिद्धे,विजयकुमार लिंबीतोटे, बसवराज माशाळे, कांतू धनशेट्टी, रमेश कापसे, सुनील गोरे, देवीदास कवटगी, दयानंद रोडगे, निखिल पाटील, दिनेश पटेल, गजानन पाटील, ओंकार कोरे अविनाश मडिखांबे, नागराज कुंभार आदी उपस्थित होते.
Post Views: 8