Monday, October 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in solapur
0
उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; shaking: 0.10129823; multi-frame: 1; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
​
कपाळावर बुक्क्याचा टिळा, हातात टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखात “जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल” चा जयघोष… अशा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून भव्य ‘वारकरी दिंडी’ सोहळा पार पडला. या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला.
          ​सर्वप्रथम संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, मार्गदर्शिका दीप्ती शहा व पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
  ​मूर्ती पूजनानंतर प्रशालेच्या प्रांगणातून शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिंडी रॅली काढण्यात आली.
​विद्यार्थ्यांनी कपाळावर बुक्का, गळ्यात माळा व हातात टाळ घेऊन पांढरा शुभ्र पोशाख परिधान केला होता, तर विद्यार्थिनींनी आकर्षक वेशभूषा करत हातात आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत सहभाग घेतला.
​अनेक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीसह विविध संतांच्या हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
​हातात टाळ-मृदंग घेऊन अभंग आणि गवळणी गात विठुरायाचा गजर करत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
​प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी रेखाटलेले विठ्ठलाचे अत्यंत सुंदर व रेखीव चित्र या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
​​नगरप्रदक्षिणेनंतर दिंडीचे प्रशालेत आगमन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रांगणात ‘रिंगण’ घातले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी पावली तसेच फुगड्या देखील खेळल्या.विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विठ्ठलभक्ती पाहून उपस्थित थक्क झाले. यानंतर सहशिक्षिका पल्लवी खांडवे व सोनाली उंडे यांनी सादर केलेल्या विविध अभंग आणि भजनांनी संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय बनवले.
​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुप कस्तुरे, जयश्री आगरखेड, प्रीती वऱ्हाडे, सुहास छंचुरे, अभिजीत पाटील, मीनाक्षी बेळळे, प्रियंका जैन यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 110
Previous Post

दहावी 1977-78 बॅच; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Next Post

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

ताज्या बातम्या

कुलकर्णी म्हणाले मी काहीच केले नाही

October 26, 2026
धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

धर्मा भोसले यांचा समाजकार्याचा वारसा विनोद भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत

October 25, 2026

दिवाळी सुट्टी तोंडावर; विद्यार्थ्यांच्या कृतिपत्रिका अद्याप रखडल्या!

October 25, 2026

दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय उपाययोजनांसाठी सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषद

October 25, 2026
ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ड्रीमचे काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

October 25, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची विद्यापीठ मल्लखांब संघात निवड

October 25, 2026
निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

निसर्गभेटीतून ज्ञानाचा आनंद; एमआयटी व्हीजीएसच्या विद्यार्थ्यांचा अनुभव

October 25, 2026

दुष्काळाच्या झळा आठवडी बाजारालाही; बार्शीच्या बाजारपेठेत शुकशुकाट

October 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1416336

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!