अक्कलकोट – म.म. श्री शहाजी प्रशाला, अक्कलकोट येथील दहावी च्या 1977-78 बॅच मधील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा श्री स्वामी समर्थ राजेराय मठ स्टेशन रस्ता अक्कलकोट येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी राजेराय मठाचे सचिव माजी. प्राचार्य डॉ किसन झिपरे व उपाध्यक्ष विकास दोडके यांनी माजी विद्यार्थ्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. प्रथम दिवसाच्या . स्नेहमेळावा प्रशालेच्या प्रार्थनेने सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात अवधूत कुलकर्णी, प्रदीप पाटील, सुहास सरदेशमुख, महेश कुलकर्णी,. शुभांगी आढेकर,. आम्रपाली मेश्राम,. निकिता शहा,. सरोज शहा इत्यादींनी
मनोगते व्यक्त केली.
स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी डॉ. किसन झिपरे, विकास दोडके, डॉ. मलीनाथ बोधले गुंडोपंत पत्की, सुरेश चेंडके यांनी सहकार्य केले.