सोलापूर : प्रख्यात गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या 46 व्या पुण्यातिथीनिमित्त गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी 7 वाजता सरगम स्टुडिओतर्फे यादों की मैफिल हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक आरिफ एलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमास सुधीर खरटमल, हाजी तौफिक हत्तूरे, जाविद झुंजे, जाकिर हुंडेकरी, नसिमा पठाण, हारुण शेख, इलियास सिध्दीकी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन बब्बी हुमनाबादकर हे करणार आहेत. कार्यक्रमात आरिफ एलाल, अनिता अय्यर, इम्रान अली, मुस्तकीम एलाल, बाबर कोरबु, जुबेर पटेल, राजकुमार कोकलगी, अशोक दर्गी, घोडके, लता राज, शंकर सरवदे, शफोद्दीन सय्यद, एजाज खलिफा, शार्दुल आपली कला सादर करणार आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असणार आहे. या कार्यक्रमास चाहत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 16