जालना – टेनिक्वाईट (रिंग टेनीस) असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 10 ते 12 जुलै 2026दरम्यान संगमनेर जि. अहिल्यानगर येथे 38 व्या सब ज्युनीयर टेनिक्वाईट राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 4 जुलै 2026, शनिवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन एस. व्हि. इंग्लिश स्कुल, पेन्शनपुरा, कॉलेज रोड जालना या ठिकाणी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होणार्या खेळाडुंची जन्मतारीख 01/01/2012 किंवा त्यानंतरची असावी. सदर निवड चाचणीतुन 6 मुले व 6 मुलींची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
अधिक माहितीकरीता संघटनेचे शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, सुभाष पारे, अमोल काटकर, श्रीमती शेख महेजबीन, वेदांत सोरटी, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड, सुरेश त्रीभुवन, गोवर्धन वाहुळ, नितीन जाधव, यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत राजे भोसले, नगरसेवक अश्विन अंबेकर, देवगिरी स्कुलचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी, जिईएस कॅम्पस राजुर चे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, माजी नगरसेवक बाला परेदसी, मिर्जा अनवर बेग, ज्ञानेश्वर ढोबळे, मो. मारूफ खान, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन जालना व कला क्रीडा दूत फ ॉऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















