सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तर शालेय रग्बी स्पर्धेचे शासकीय मैदान, नेहरूनगर येथे सोलापूर महानगरपालिका सभागृह नेता नरेंद्र काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी सोमपा क्रीडा अधिकारी नजीर शेख, जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष भीमराव बाळगे, सचिव इकबाल शेख,जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना अध्यक्ष दशरथ गुरव, सचिन गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुरेश सोनवणे,मनोज बाळगे,प्रचिता जोगदांडे, पौर्णिमा पुजारी यांनी केले सदरील स्पर्धा १४,१७ व १९ वर्षाखालील मुले- मुलींच्या वयोगटात खेळविले जाणार आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार व अर्जुन सुरवसे परिश्रम घेत आहेत स्पर्धेसाठी पंच म्हणून सुजल राणदिवे काम पाहत आहेत
निकाल : 14 वर्षाखालील मुली
*प्रथम क्रमांक बटरफ्लाय स्कूल
*द्वितीय क्रमांक*
सिद्धेश्वर कन्या प्रशाला
*तृतीय क्रमांक*
गांधीनाथा रंगजी विद्यालय
19 वर्षाखालील मुले
*प्रथम क्रमांक*
डी एच बी सोनी कॉलेज
*द्वितीय क्रमांक*
आयडियल स्कूल
*तृतीय क्रमांक*
सुरवसे प्रशाला
14 वर्षाखालील मुले
*प्रथम क्रमांक*
सुरवसे प्रशाला
*द्वितीय क्रमांक*
ठोकळा प्रशाला
*तृतीय क्रमांक*
ज.रा.चंडक
—-
Post Views: 7