Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

तरुण भारतbyतरुण भारत
July 26, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या बहुप्रतिक्षित २४x७ पाणीपुरवठा वितरण योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी गती दिली आहे. विधानभवनातील कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे १,५०० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत डीपीआर, निविदा प्रक्रिया, शासकीय जागा हस्तांतरण आणि निधी उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
         बैठकीत महापालिकेच्या प्रशासकीय मान्यतेनंतर जागतिक बँकेच्या MUWREP योजनेअंतर्गत तत्त्वतः मंजूर झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत डीपीआर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत काम मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.प्रकल्पाचा दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी डीपीआरमध्ये सौरऊर्जा आणि बॅटरी स्टोरेजचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत प्रकल्पासाठी पात्रता असल्याने, प्रकल्प खर्चाच्या २५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
        प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कृषी, जलसंपदा, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागांच्या शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जागांचा तात्पुरता ताबा घेऊन त्या सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
         याशिवाय, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास त्याचा थेट अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या योजनेअंतर्गत अंत्रोळीकर नगर, शेळगी, दहिताणे, कासबे सोलापूर–हिप्परगा मार्ग, विद्यापीठ परिसर आणि पोदार शाळेजवळ उंच पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाणार आहे.
          या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, स्थायी समिती अध्यक्षा रंजिता चाकोते, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा MITRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते.
        मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांमुळे सोलापूरच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी गती मिळाली असून, शहराला आधुनिक, सक्षम आणि अखंडित २४x७ पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
—-
Post Views: 20
Previous Post

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

Next Post

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0999776

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!