सोलापूर – मुलाला जन्म देऊन 24 तास ही उलटली नव्हते अन् ते बाळ आईविना शनिवारी पोरके झाले आहे. दि. 4 एप्रिल रोजी सायंकाळी आईचा मृत्यू झाला. या मृत्यूस किल्ला बगीचा येथील दबडे हॉस्पिटल मधील स्टाफ, कर्मचारी व डॉक्टर दोषी आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नसल्याचा असा इशारा रुषाली हजारे यांनी दिला होता. या घटनेबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी ७ वाजता अनुजा बावळे, वय २५ रा. निराळे वस्ती यांना मुलगा झाला. रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान अनुजा हिला त्रास होण्यास सुरुवात होत होती, डॉक्टरांना सांगून देखील दोन ते तीन तास कोणीही लक्ष न दिल्याने तिला जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना अश्विनी हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले. परंतु तेथे नेण्या अगोदरच अनुजाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे.
माझ्या पत्नी बरोबर जे घडले आहे ते इतरांबरोबर घडू नये, यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला न्याय मिळावा अशी आर्थ हाक पोलीस प्रशासनाकडे अनुजाचे पती विनायक बावळे यांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळतात ज्ञानेश्वर सपाटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, बसवराज कोळी, वैभव गंगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बाळाच्या आईला न्याय देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी रवी गंगणे, भुजंग गंगणे, विवेक हजारे, सौरभ कन्हेरी व बावळे – गंगणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अनुजाच्या मृत्यू मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अनुजा सनी बावळे हिचा झालेला मृत्यू हा अत्यंत संशयास्पद असून, संबंधित प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर संशय आहे. या प्रकरणात डॉ. माधुरी दबडे यांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच संबंधित डॉक्टरांवर भारतीय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
– वैभव गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शहर अध्यक्ष

















