सोलापूर – दारूच्या नशेमध्ये तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या पंढरपूरच्या तरुणाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.
निशांत मच्छिंद्र मोरले (वय 26 वर्ष , रा. मूळ राहणार कोळीवाडा , अलिबाग, रायगड , सध्या राहणार पंढरपूर) असे त्या मयत तरुणाचे नाव असून तो 24 मे रोजी दुपारी लक्ष्मी टाकळी येथे दारूच्या नशेत तोल जाऊन खाली पडला होता . यात मार लागून जखमी झाल्याने त्याला पंढरपूरच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात अर्धवट शुद्धीवर असताना सात जून रोजी रात्री दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी मृत्यू झाला .
Post Views: 12