सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळानिमित्त सोलापूरच्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली.
या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंड्याल, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, भाजप सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मनीष देशमुख, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेतून निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सलग १२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. मंदिरात भारताच्या प्रगतीसाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक ऊर्जा लाभावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या ध्येयवाक्याचा उल्लेख करत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक समृद्ध, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून पुढे जावो, अशी भावना व्यक्त केली. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भारतमातेच्या सेवेसाठी नरेंद्र मोदी यांना आणखी अनेक वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
Post Views: 10