Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुण्यातील 40 एकर भूखंड खरेदी व्यवहार अखेर रद्द

तरुण भारतbyतरुण भारत
November 8, 2025
in mumbai
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील शासनाच्या मालकीच्या 40 एकर जमिनीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेला खरेदी व्यवहार अखेर रद्द करण्यात आला.

या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. एका महिन्यात तपास करून त्यांनी अहवाल सादर करावयाचा आहे.

शासनाची हजारो कोटीची जमीन बेकायदेशीरपणे 300 कोटीला आणि अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर विकली गेल्याचे उघडकीस आल्याने महायुती सरकार बॅकफुटवर आले आहे. विरोधकांसह सर्वच बाजुनी त्याबाबत टीकेची झोड उठू लागल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांकडे तिघाजणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये अमेडिया कंपनी व त्याची 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवार याचा समावेश नाही. तर त्यांच्यावतीने दस्तऐवजावर स्वाक्षरी करणाऱ्या दिग्विजय पाटील व जमिनीची पावर ऑफ ॲटर्नी असलेल्या शीतल तेजवानी यानाच आरोपी बनवण्यात आले आहे.

 पुत्राच्या या अजब ‘कर्तबगारी’मुळे अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते. शुक्रवारी त्यांनी हा खरेदी व्यवहार जमिनी खरेदी व्यवहार रद्द करण्यात आले असल्याची माहिती पत्रकारांशी दिली. मात्र पार्थ पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्यांनी बोलताना सांगितले की, व्यवहारात ज्यांची नावे आली आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात या व्यवहारात एकाही रुपयाही दिला गेलेला नाही. त्याची नोंदणी कशी झाली, पुढील प्रक्रिया कशी झाली हे तपासातून समोर येईल.कुणी, कुणाची फसवणूक केली, कुणी दबाव आणला, कुणाचे फोन गेले, अधिकाऱ्यांनी सह्या कशा केल्या हे सगळं तपासात समोर येईल. मला व्यवहार झालेला माहिती नव्हता. माहिती असते तर आधीच सांगितले असते. नियमाबाहेर जाऊन कुणीही काही केले तर मला ते चालणार नाही. मी माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही विचारले की डीसीएम ऑफिसमध्येही विचारणा करण्यात आली की इथून कुणी फोन केला होता का?. तिथून कुणीही फोन केला नव्हता, असे अजित पवार यांनी सांगितले.

आज हा खरेदी व्यवहार रद्द करण्यात आला आहे. तसेच आज समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीही पारदर्शकपणे काम करेल. यापुढे अधिकाऱ्यांनी एखादे प्रकरण तुमच्यासमोर आले आणि ते नियमांत बसत नसेल तर कुठल्याही दबावाखाली न येता त्यावर काट मारायची. कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो की माझ्या नावाचा वापर केला असेल तर. मला हे चालणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

_________________

महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल 

• पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती 

• पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश शुक्रवारी जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा आहे.

पुणे शहरातील मुंढवा येथील सर्वे नंबर ८८ मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली.

महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव असे पाच सदस्य आहेत.

Post Views: 57
Previous Post

जमीन घोटाळा प्रकरणी  अजित पवार यांनी राजीनामा द्यावा : विजय वडेट्टीवार 

Next Post

संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संकर्षण व्हाया स्पृहा – गप्पा,गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमे निमित्त दत्तमंदिरात भक्तांची मोठी गर्दी

July 29, 2026

३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

July 29, 2026

संत प्रभाकर महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

July 29, 2026

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010437

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!