Wednesday, May 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवसा ढवळ्या ५० झाडांची कत्तल ; शेतजमीन प्लॉटिंग साठी ५ ट्रक लाकूड विक्रीचा आरोप.

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in crime
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महानगरपालिका हद्दीतील सलगरवाडी परिसरात चोपन्न मीटर रोडलगत असलेल्या सुमारे ८ हेक्टर शेतजमिनीतील ३० ते ५० वर्षे वयाची पिंपळ, जांभूळ, आंबा व बहुतांश लिंब जातीची तब्बल ४० ते ५० मोठी झाडे अवैधरित्या तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटिंगसाठीजागा रिकामी करणे साठी गेल्या दहा दिवसांत ही झाडे तोडून सुमारे पाच ट्रक लाकूड विक्री केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सदर परिसर तिन्ही बाजूंनी कंपाउंड वॉलने बंदिस्त असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले. संबंधित शेतमालकाबाबत विचारणा केली असता कोणीही स्पष्ट माहिती देण्यास पुढे आले नाही.

घटनेची माहिती मिळताच उपवनसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी महानगरपालिका उद्यान विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. उद्यान प्रमुख कोमल काशीद यांनी वृक्ष प्राधिकरण विभागातील दिलीप बेंबरे यांना माहिती देण्यास सांगितले. दिलीप बेंबरे यांनी तत्काळ स्पॉट व्हिजिट करून पाहणी करण्याचे सांगितले होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

यानंतर उद्यान प्रमुख कोमल काशीद यांनी मच्छिंद्र गेंजगे व हलसंगी यांना घटनास्थळी पाठविले. महापालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.महापौर विनायक कोंड्याल यांनाही सदर विषयी कल्पना दिली असता कठोर कार्यवाई महानगरपालिके कडुन होईल म्हणाले.

दरम्यान, महेश देवधर यांनी लाकूड भरलेली आयशर गाडी (क्रमांक MH 13 CJ 9047) अडवून ठेवत वनविभाग व पोलिसांना माहिती दिली. वनविभागाच्या सौ. शिंदे मॅडम तसेच पोलिसांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

या कारवाईवेळी कोमल काशीद, उद्यान अधीक्षक, दिलीप बेंबरे, मच्छिंद्र जमादार, सोमशंकर हलसंगी, सिद्राम बोराडे, विठ्ठल यातकर, यल्लप्पा पुजारी, मनोज सरवदे आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सुरज कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

सोलापुरात सध्या उन्हाचा पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला असताना जनावरे, पशुपक्षी आणि नागरिकांना सावली देणारी मोठी झाडे दिवसाढवळ्या तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश शासन देत असताना अशा प्रकारे विना परवानगी वृक्षतोड होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित जमीनमालकावर पर्यावरण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

वृक्षतोडीसाठी शासकीय नियम काय?

महाराष्ट्रात झाडतोडीसाठी विशिष्ट शासकीय नियम व निकष लागू आहेत. झाडाचा प्रकार, जागा आणि झाड तोडण्यामागील उद्देश यावर परवानगी अवलंबून असते. खाजगी शेतातील झाडे तोडण्यासाठी वनविभाग, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते.

अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून तपासणी केली जाते व आवश्यक असल्यासच परवानगी दिली जाते. वड, पिंपळ, आंबा, साग, चंदन यांसारख्या झाडांसाठी विशेष निकष लागू असतात. एका झाडाच्या बदल्यात ठराविक नवीन झाडे लावणे बंधनकारक असते.

विना परवानगी वृक्षतोड केल्यास दंड, गुन्हा दाखल होणे तसेच पर्यावरणीय नियमांनुसार कठोर कारवाईची तरतूद आहे. प्लॉटिंगसाठीदेखील नॉन-अ‍ॅग्रीकल्चर (NA), ले-आउट मंजुरी आणि पर्यावरणीय अहवाल आवश्यक असतो.

 

याविषयी आजच्या ठळक घडामोडी.

 सलगरवाडीत ५० झाडांची अवैध कत्तल !

 प्लॉटिंगसाठी ५ ट्रक लाकूड विक्रीचा आरोप

 वनविभाग, महापालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई

 लाकूड भरलेली आयशर गाडी जप्त

 पर्यावरणप्रेमींकडून कठोर कारवाईची मागणी.

 

 

सोलापूरात सद्या खूप उष्णता आहे. दुपारी 11 नंतर घराबाहेर पडणे मुश्किल आहे.माझ्या परिसरात जर असे झाले असेल तर ते खूपच चुकीचं आणि वेदनादाई आहे.आम्ही आमच्या प्रभागात जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी नविन झाडे लावण्याचे काम कित्येक वर्षांपासून करतो आहे. झाडे तोडणारे कोणीही असो विनापरवानगी झाडे तोडली असतील तर संबधितवर नियमानुसार मालक व झाडे तोडणारे कामगार यांच्यावर कडक कार्यवाही केली पाहिजे.

(फोटो.)

सौ.आरती अक्षय वाकसे

नगरसेविका (भा. ज. पा )

 

 

आज आम्ही घटनास्थळी पोहोचलो माहिती घेतली असता 10 दिवसापासून झाडी तोडली जातं आहेंत, आजतायत 4 ट्रक भरून लाकडे नेली आहेंत. आज आम्ही एक पकडला. मा. उपमहापौर देवधर मॅडम घटना स्थळी येऊन पहणी करून गेल्या आहेंत.

 सोलापुरात तापमान वाढत चाललेला आहे आणि विना परवाना आपल्या शक्तीचा वापर करून अशा तोडणाऱ्या मोठ्या बिल्डरांना माफी दिली जाणार नाही याची सखोल चौकशी व्हावी अशी प्रशासनास विनंती आहे.आम्ही सर्व वृक्षप्रेमी मिळून जो पर्यंत झाडे तोडीचा छडा नाही लागला तर अधिकारी यांच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन  करेल. आणि जो कोणी दोष असेल त्याच्या घरासमोर ही आंदोलन करणार आहोत.

 

फोटो.

 

डॉ. मनोज देवकर,

पर्यावरण दुत, सोलापूर.

Post Views: 6
Previous Post

फिनेल पिऊन आत्महत्या ; बालकास उचलून आपटले

Next Post

ग्रामीण भागातील विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख पद्धतीने पूर्ण करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ग्रामीण भागातील विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख पद्धतीने पूर्ण करा

ताज्या बातम्या

सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब चा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा

May 27, 2026
बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न

बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न

May 27, 2026
“पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम

“पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम

May 27, 2026

कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची शिंदे सेनेच्या मुन्ना साठेंची मागणी

May 27, 2026
अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

May 27, 2026
जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

May 27, 2026

सीईओंना थेट व्हॉट्सअॅप करा; तक्रारींवर आता ‘ऑनलाइन’ कारवाई”

May 27, 2026
घोषाच्या गजरात सोलापुरात संघ शक्तिचा आविष्कार

घोषाच्या गजरात सोलापुरात संघ शक्तिचा आविष्कार

May 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0881257

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697