Monday, June 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अशोक शिंदेंनी स्विकारला स्वदेशी बाणा !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2023
in maharashtra
0
अशोक शिंदेंनी स्विकारला स्वदेशी बाणा !
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘सारं काही तिच्यासाठी’ हि गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.

पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी”.

१. सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगाल?

– सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेची कथा खूप दमदार आहे. या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही कथा दोन बहिणींची, पती-पत्नीच्या प्रेमाची आणि ते एकमेकांना कसे समजून घेतात याची. ही गोष्ट आहे संपूर्ण कुटुंबाची आणि तत्वांची. आमच्या ह्या मालिकेचं एक वैशिष्ट म्हणजे या मालिकेत खलनायक, खलनायिका असं कोणीच नाहीये. या मालिकेत प्रत्येकजण खूप मेहनत घेत आहे आणि आपले सर्वोत्तम देत आहे. हे प्रेक्षकांना देखील मालिकेत दिसून येईल. या मालिकेचे शीर्षकगीत आणि संगीतही अप्रतिम आहे.

२. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?

– मी रघुनाथ खोत ही भूमिका साकारत आहे. रघुनाथने अगदी लहान वयातच वडील गमावले. तेव्हापासून त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. लहान वयातच कुटुंबाची एवढी मोठी जबाबदारी घेतल्याने तो जबाबदार आणि परिपक्व झाला. तो अतिशय शिस्तप्रिय आणि सभ्य स्वभावाचा एक सज्जन व्यक्ती आहे. रघुनाथला पहिला असेल, तो दिसायला खूप गंभीर आणि बायकोला आपल्या बहिणीला भेटू देत नाही असं वाटते, किंवा बायको त्याला घाबरते असं दिसतं. पण रघुनाथच्या आयुष्यात असा एक ट्विस्ट येतो जिथे त्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, ‘सारं काही तिच्यासाठी’ चा संपूर्ण अर्थ तिथेच आहे. रघुनाथ हा कर्तव्यनिष्ठ आणि एकदम सच्चा माणूस आहे व आपल्या बायकोवर अतिशय प्रेम करणारा आहे. इतक्या वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर मला ही वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मी त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे.

३. जेव्हा तुम्हाला ह्या मालिकेबद्दल विचारलं तेव्हा तुमची काय भूमिका होती?

 

— झी ने मला जवळजवळ ८ वर्षांनंतर पुनरागमन करण्याची ही अप्रतिम संधी दिली आहे, त्यामुळे मी खूपच आनंदी आहे.

४. तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल काय सांगाल आता पर्यंतचा प्रवास कसा राहीला?

– माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे. जवळ जवळ १७० सिनेमात नायक खलनायक म्हणून काम केले आहे. माझी ही झी मराठी वरची मालिका आहे ती १०६ वी मालिका आहे. आजपर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवरती काम केली. झी मराठी शी माझा नातं अल्फा गौरवपासून आहे. मला माझा पहिला अभिनय पुरस्कार मिळाला तो अल्फा गौरवमध्ये. आता पुन्हा झी मराठीने मला हे सुंदर पात्र साकारण्यासाठी आणि झी मराठीचा एक भाग होण्याची संधी दिली आहे. ही एकंदरीत एक छान भावना आहे. मला ही अप्रतिम मालिका दिल्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे.

Post Views: 89
Previous Post

मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी, त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी – पंकजा मुंडे

Next Post

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

ताज्या बातम्या

मुलींच वय वाढतय, तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका : भारत वाघमारे 

मुलींच वय वाढतय, तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका : भारत वाघमारे 

June 1, 2026
ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

June 1, 2026
विश्वमंगल मराठीफाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच उत्साहात संपन्न

विश्वमंगल मराठीफाउंडेशन आयोजित संवाद बैठक नुकतीच उत्साहात संपन्न

June 1, 2026

भाईंचा वारसा पुढे नेण्याचे काम चंदेले करीत आहेत : सुशीलकुमार शिंदे

June 1, 2026

व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता

June 1, 2026
मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट व बिजापूर क्रिकेट क्लब विजयी

मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट व बिजापूर क्रिकेट क्लब विजयी

June 1, 2026

डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!

June 1, 2026
अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी; दर्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी

अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी; दर्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी

June 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888854

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697