करकंब – भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील डॉ.हेडगेवार वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थिनी व महिलांसाठी बस स्थानकासमोर मारुती मंदिरा शेजारी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.येथील राष्ट्रीय महामार्ग बस स्थानकासमोर शालेय विद्यार्थिनींसाठी निवाऱ्याची कोणतीही सोय नाही.त्याचप्रमाणे विद्यार्थिनी व महिलांसाठी बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने ही सर्व गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने बस स्थानकासमोर महिला व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी विद्यार्थी आणि पुरुषाने बसू नये असे आव्हान डॉ.हेडगेवार वाचनालयाचे अध्यक्ष महेंद्र येलपले यांनी केले आहे.यावेळी विजय काटे,मारुती गिड्डे,संतोष भोसले,नवनाथ माने,दिलीप विभुते,कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ.श्रीधर यलमार आदी उपस्थित होते.