Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसला हमखास विजय मिळण्याची खात्री होती पण छत्तीसगढमध्ये एका तासात पूर्ण चित्र पालटलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 3, 2023
in political
0
काँग्रेसला हमखास विजय मिळण्याची खात्री होती पण छत्तीसगढमध्ये एका तासात पूर्ण चित्र पालटलं
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्तीसगढमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा झटका, भाजपने घेतली निर्णायक आघाडी. रायपूरमधील सात जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर.

 

 

गेल्या काही दिवसांपासून पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात धामधूम सुरु आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगढची जनता कोणाच्या बाजूने कौल देणार,याची उत्सुकता सर्वांना होती. मिझोराम आणि तेलंगणा वगळता इतर राज्यांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. यापैकी छत्तीसगढमध्ये काँग्रेसला हमखास यश मिळेल, असा अंदाज होता. विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सकडूनही तसा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर समोर आलेले कल पाहता छत्तीसगढमध्ये काँग्रेस पक्ष भाजपला धोबीपछाड देऊन सहजपणे सरकार स्थापन करेल, असे जवळपास वाटत होते.

 

 

मात्र, सुरुवातीच्या अडीच ते तीन तासांचा कालावधी उलटल्यानंतर छत्तीसगढमध्ये मतमोजणीचे कल पालटायला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात तर हे चित्र पूर्णपणे बदलले. सुरुवीताच्या दोन तासांमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात भाजपने प्रथम काँग्रेसशी बरोबरी साधली आणि त्यानंतर निर्णायक आघाडी घेतली. सध्याच्या घडीला छत्तीसगढ विधानसभेच्या ९० जागांपैकी ४८ जागांवर भाजप तर ४० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. मध्यंतरीच्या काळात भाजपने १० जागांची आघाडी होती. मात्र, आता ही आघाडी पुन्हा ४ जागांपर्यंत खाली आली आहे. परंतु, भाजप अद्याप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. तर दोन जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत. छत्तीसगढमध्ये बहुमताचा आकडा ४६ इतका आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये हे चित्र कायम राहिल्यास छत्तीसगढमध्ये काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावे लागेल.

 

 

छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हेदेखील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. पाटण विधानसभा मतदारसंघात भूपेश बघेल ५०० मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय बघेल आघाडीवर आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अंतिम निकाल काय लागतो, हे पाहावे लागेल. छत्तीसगढमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरली होती. याचा फटका प्रत्यक्ष निवडणुकीत बसला का, हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

Post Views: 94
Previous Post

एक नवी सुरुवात… हृता दुर्गुळेने घेतलं स्वतःचं घर, नवऱ्यासोबत शेअर केला नव्या घरातला पहिला फोटो

Next Post

मध्य प्रदेश किंवा राजस्थान दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल; संजय राऊतांचा दावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मध्य प्रदेश किंवा राजस्थान दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल; संजय राऊतांचा दावा

मध्य प्रदेश किंवा राजस्थान दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल; संजय राऊतांचा दावा

ताज्या बातम्या

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड

February 19, 2026

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम

February 19, 2026

प्रभाग २२ मध्ये १४ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन; आश्वासनांपासून कृतीकडे विकासाची वाटचाल

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686809

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697