केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार श्री राम सातपूते जी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुतीचे सरकार सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मागील १० वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंदाच्या अनेक योजनांचा लाभ मिळाला असल्याचे सांगून सोलापूरची जनता विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजप-महायुतीला पुन्हा विजयी करेल असा विश्वास श्री गडकरीजी यांनी या वेळी व्यक्त केला.