केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी सांगली जिल्ह्यातील जत येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार श्री संजयकाका पाटील जी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.
मागील १० वर्षांत सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची आणि विजेची कामे झाली आहेत. दुष्काळी भागांत सिंचनासाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा शेतकरी तसेच महिला, युवा व इतर वर्गातील लोकांना लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी संजयकाका पाटील यांना या वेळीही बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन श्री गडकरीजी यांनी या वेळी उपस्थित जनतेला केले.