Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३ दिवसांत माफी मागा नाहीतर कारवाईला सामोरे जा, एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना नोटीस, आता कायदेशीर ‘सामना’

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 29, 2024
in maharashtra
0
३ दिवसांत माफी मागा नाहीतर कारवाईला सामोरे जा, एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना नोटीस, आता कायदेशीर ‘सामना’
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. त्याचवेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कारस्थाने केली’, असे गंभीर आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून ‘रोखठोक’ या सदराखाली त्यांनी लेख लिहून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. याचप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी नोटिसीद्वारे राऊत यांना दिलाय.

 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा धुरळा खाली बसल्यावर संजय राऊत यांनी २६ मे रोजी ‘सामना’मधून लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या राजकारणावर भाष्य करणारा लेख लिहिला. या लेखातून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करताना निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला. गैरसंविधानिक बेकायदा मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा आरोप करून अजितदादांना एकही जागा मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. याच आरोपांवरून मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी नोटिसीमध्ये काय म्हटलंय?

 

संजय राऊत यांचे हे आरोप दिशाभूल करणारे असून जनमाणसात माझी प्रतिमा मलिन करणारे आहेत. यातून त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फायदा मिळवून द्यायचा आहे, असे सांगत माझ्यावरील आरोपाचे ३ पुरावे द्या नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असे एकनाथ शिंदे यांनी नोटिसीतून म्हटले आहे.

वकील चिराग शाह यांच्याद्वारे एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना नोटीस पाठवली आहे. या ते म्हणतात, माझे अशील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४*७ राजकारण आणि समाजकारणात सक्रीय असून जनमाणसांत त्यांचे स्थान मोठे आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांतून त्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहेच, परंतु त्यांनी अधिकारांचे उल्लंघन केले असून म्हणूनच त्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलंय?

 

५० खोके एकदम ओके… इसे कहते है उलटा चोर कोतवाल को डाटे… गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक लिगल नोटीस भेजी है. very intresting and one of the funny political document.अब आयेगा मजा! जय महाराष्ट्र…..

Post Views: 34
Previous Post

बाजारातून कमाई करण्यासाठी ब्रोकरेजने सुचवले डझनभर स्टॉक्स… अदानी, अंबानी नाही तर PSU कंपन्यांचा दबदबा

Next Post

आधी कुटुंबातील ८ जणांची केली हत्या, मग गळफास घेऊन संपवले स्वत:चे जीवन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आधी कुटुंबातील ८ जणांची केली हत्या, मग गळफास घेऊन संपवले स्वत:चे जीवन

आधी कुटुंबातील ८ जणांची केली हत्या, मग गळफास घेऊन संपवले स्वत:चे जीवन

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960330

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!