Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 4, 2024
in solapur
0
मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 4 जुलै (हिं.स.) : रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणीबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी तयार केलेली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि रेल्वे सेवांची वक्तशीरपणा राखण्यासाठी ट्रेनमध्ये अलार्म चेनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

असे निर्दशनास आले आहे की, प्रवासी उशीरा पोहोचणे, उतरणे/मधल्या स्थानकांवर चढणे इत्यादी क्षुल्लक कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत असून अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो.

मध्य रेल्वे एसीपी च्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे. एप्रिल-२०२३ ते जून-२०२४ या कालावधीत (दि. २८.६.२०२४ पर्यंत), मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ६३.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.विभागनिहाय प्रकरणे, अटक केलेल्या व्यक्ती आणि दंड वसूल करण्यात आलेला तपशील खालीलप्रमाणे आहे.

मुंबई विभाग –

प्रकरणे- ४३८७, अटक ३७४१, दंड वसूल – रु.२३.४७ लाख

भुसावळ विभाग –

प्रकरणे-२९३१, अटक २८२४, दंड वसूल – रु. २१.७६ लाख

नागपूर विभाग –

प्रकरणे-१७०६, अटक १४०४, दंड वसूल – रु. ८.७१ लाख

पुणे विभाग –

प्रकरणे-१९९२, अटक १४४०, दंड वसूल – रु.७.७३ लाख

सोलापूर विभाग –

प्रकरणे- ४१८, अटक २४८, दंड वसूल – रु.१.५४ लाख

अलार्म चेन खेचण्याच्या वैध कारणांमध्ये आगीच्या घटना, आरोग्य आणीबाणी, गुन्हेगारी प्रकरणे किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात यासारख्या आणीबाणीचा समावेश होतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी या परिस्थितींकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

ट्रेनमधील एसीपीच्या कृतींचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनवर परिणाम होत नाही तर त्यामागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

प्रवाशांना सूचित केले जाते की गैर-आणीबाणीच्या परिस्थितीत, मदतीसाठी पर्यायी मार्ग आहेत. ते ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात, जसे की प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई), १३९ वर Rail Madad डायल करू शकतात किंवा सहप्रवाशांची मदत घेऊ शकतात.

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना त्यांच्या ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान तीस मिनिटे अगोदर स्थानकावर पोहोचून त्यांच्या प्रवासाचे जबाबदारीने नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. लवकर पोहोचणे केवळ त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करत नाही तर रेल्वे सेवांची वक्तशीरता राखण्यात देखील योगदान देते.

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना अलार्म चेन जबाबदारीने वापरण्याचे आवाहन केले आहे आणि वास्तविक आपत्कालीन परिस्थिती वगळता ती ओढण्यापासून परावृत्त करीत आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रवासी सुरक्षितता, वक्तशीरपणा आणि रेल्वे सेवा सुरळीत चालवण्यात योगदान देतात.

Post Views: 30
Previous Post

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना

Next Post

हायकोर्टाने फेटाळली सुनील केदारांची विनंती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हायकोर्टाने फेटाळली सुनील केदारांची विनंती

हायकोर्टाने फेटाळली सुनील केदारांची विनंती

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878896

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697