*भाजपचे ज्येष्ठ नेते कै. राजाभाऊ दहिवाळ यांना भाजपा कार्यालयात श्रद्धांजली अर्पण*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, माजी नगरसेवक कै. राजाभाऊ दहिवाळ यांना आ. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालय येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दीनदयाळ बँकेचे संचालक, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक कै राजभाऊ दहिवाळ यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार दि 20 जुलै रोजी आ. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालय येथे परळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अश्विन मोगरकर यांनी कै. राजभाऊ दहिवाळ यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की कै राजभाऊ यांनी आपली संपूर्ण हयात भारतीय जनता पक्षासाठी वाहून घेतली होती. युवा कार्यकर्त्यांना कायम मार्गदर्शन त्यांनी केले. आपल्या मृदू स्वभावाने त्यांनी अफाट लोकसंग्रह तयार केला होता. दीनदयाळ बँकेचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वंचितांना आर्थिक आधार देत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. कै राजभाऊ दहिवाळ यांच्या जाण्याने परळी भारतीय जनता पक्षाने एक निष्ठावंत व कर्मठ कार्यकर्ता गमावला आहे.
यावेळी कै. राजभाऊ दहिवाळ यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुरेश गिरडे, राजेंद्र ओझा, जी. एस. सौंदळे, डी एल गायकवाड गुरुजी, नितीन समशेट्टे, ज्ञानोबा सुरवसे, बंडूनाना कोरे, मोहन जोशी, अनिस शेख, राजेश कौलवार, दिलीप नेहरकर, श्रीपाद शिंदे, मिलिंद कांबळे आदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.