सोलापूर – एम. ए. पांगलअँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सोलापूर येथील नामांकित विज्ञान व उर्दू विषयाचे प्रखर वक्ते शिक्षक इलियास अब्दुल लतीफ शेख यांना महाराष्ट्र स्टेट उर्दू साहित्य अकादमी, मुंबई तर्फे नामांकित उर्दू पत्रकार शुऐब हाशमी यांच्या शुभहस्ते शालेय स्तरावरील “आदर्श उर्दू शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा सन्मान त्यांना त्यांच्या अध्यापन व शैक्षणिक सेवांसोबतच सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या मान्यतेत देण्यात आला आहे. कोविड-19 च्या महामारीच्या काळातही त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू दिले नाही. ऑनलाईन अध्यापनाद्वारे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विविध शैक्षणिक व वैज्ञानिक विषयांवर व्याख्याने दिली व आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली.
त्यांच्या सेवांच्या मान्यतेत रोटरी क्लब सोलापूर, तर्फे नेशन बिल्डर अवार्ड , गांधी फोरम तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, अविष्कार फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, अखिल भारतीय वैद्यकीय संस्था तर्फे भारत भूषण पुरस्कार, शानदार स्पोर्ट्स अँड एज्युकेशन असोसिएशन तर्फे नॅशनल गुणवंत शिक्षक पुरस्कार, व आणि अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.
इलियास शेख यांना उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद विस्तार अधिकारी अतहर परवेज दफेदार, माझी सुपरवायझर मुमताज शेख, माजी केंद्रप्रमुख मौलाली लोकापल्ली, माजी मुख्याध्यापक युसुफ शेख, संस्थेचे मुख्याध्यापक डॉ. हारून रशीद बागबान, उपमुख्याध्यापिका सुरैया जागीर तसेच शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
























