पंढरपूर – “कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात यावेळी प्रथम मोळीचे पूजन कारखान्याचे तज्ञ संचालक दाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलासराव खुळे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी व सर्व संचालक उपस्थित होते
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी गळीत हंगाम २०२५ / २६ आम्ही १२ लाख मे.टन ऊस गाळप करून यातून १२ लाख साखर पोती उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले . याबरोबरच ज्यूस ते इथेनॉल प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याचे सांगितले .
तर कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कारखाना यावर्षी प्रतिदिन सुमारे ९५०० मे टन गाळप क्षमतेने चालणार असून प्रतिदिन ९ लाख लि.क्षमतेचा आसवणी प्रकल्प व २९ मे . वॅट को जनरेशन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालवले जाणार आहेत . यासाठी आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवणेसाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी कारखान्याने केली असून त्याप्रमाणे कार्यक्षेत्रात ऊस तोडणी साठी ऊस तोडणी मजूर व वाहने येण्यास सुरुवात झाली असून यावर्षी कारखाना ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करणार आहे त्याचप्रमाणे सध्या सर्वच कारखान्यांना तोडणी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने कारखाना तोडणी यंत्राचाही ऊस तोडणीसाठी वापर करणार आहे त्याप्रमाणे कारखान्याने स्वतःच्या मालकीची तोडणी वाहतूक यंत्र विकत घेतली असून याशिवाय इतर तोडणी यंत्र धारकाबरोबरही करार केलेले आहेत ही सर्व तोडणी यंत्रे या हंगामात कारखान्यास उसाचा पुरवठा करणार आहेत
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, उमेशराव परिचारक ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे ,भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील पदाधिकारी आणि कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

















