जालना / भोकरदन : भोकरदन तालुक्यातील
मौजे केदारखेडा येथे ता . ०९ रविवार रोजी बहुजन समाज चिंतन बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दीपक शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरील बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथील बहुजनवादी विचारवंत मु. एम. बी. मगरे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ओबीसी नेते ॲड. एफ. एच. सिरसाठ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सदर बैठकीस मार्गदर्शन करताना ॲड. सिरसाठ यांनी बहुजन समाजाने महापुरुषांचा संघर्षाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून संविधानाच्या माध्यमातून आपला विकास साधावा तरच समाजात खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय लोकशाही आणि बंधुभाव प्रस्थापित होईल असा आशावाद व्यक्त केला.
प्रमुख मार्गदर्शक बहुजनवादी विचारवंत मु. एम. बी. मगरे यांनी आपल्या सविस्तर भाषणात मार्गदर्शन करताना असे सांगितले की, बहुजन कोण व कसा त्याचा इतिहास सांगून या बहुजनांच्या उत्थानासाठी भारतीय संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तशी व्यवस्था निर्माण केली. आज हेच भारतीय संविधान सत्ताधाऱ्यांकडून अडचणीत आले आहे. त्यासाठी तमाम बहुजनांनी एक होऊन संविधान विरोधी शक्तीचा पाडाव करण्यासाठी भविष्यात सज्ज राहावे अशी आव्हान देखील त्यांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी मधुकर शेजुळ, नितीन मस्के, भाऊसाहेब साठे, दीपक शेजुळ, संजय डोंगरे, प्रनिकेत सावंत, बाबासाहेब राऊत, सुभाष पवार, एकनाथ सावंत, संतोष मेहेत्रे, गौतम सावंत, साहेबराव सावंत, सुरेश सावंत आदि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नितीन मस्के यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर शेजुळ यांनी केले.

















