वैराग – इंडिया स्पोर्ट वैरागच्या वतीने दोन दिवस भव्य राज्यस्तरीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील सुमारे ७० संघांनी सहभाग घेतला होता .यामध्ये सोलापूरच्या इक्बाल क्लब संघाने प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचा २५ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
या हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन मंत्रालयातील सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांच्या हस्ते आणि माजी जि .प . सदस्य संतोष निंबाळकर , जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉ .कपिल कोरके ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर , वकील संघाचे अध्यक्ष रणजीत गुंड , पोलीस निरीक्षक कुंदन गावडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी झाले होते . रविवारी रात्री उशिरा सामने संपले व त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले .
वैराग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आल्या होत्या .
या हॉलीबॉल स्पर्धेसाठी अमरावती ,जालना ,संभाजी नगर अहिल्यानगर , सातारा , सांगली कोरेगाव , पुणे , बारामती , धाराशिव ‘ लातूर , बीड ,सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा आदी ठिकाणच्या सुमारे 70 संघाने हजेरी लावली होती .
[ हॉलीबॉल स्पर्धांमध्ये विजेते संघ
१) इक्बाल क्लब सोलापूर २) जेजुरी
३) येडशी ४) सोलापूर पोलीस
५) बस्व सूर्या लातूर ६) चरोली पुणे
७) सोलापूर सिंघम ८) सदगुरू पानगाव ]
.या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम क्रमांक २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय -२१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक १५ हजार आणि सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.
हॉलीबॉल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी इंडिया स्पोर्ट संघाचे अध्यक्ष अहेमद तय्यब शेख ,सचिव प्रतापसिंह बाबासाहेब माने-रेड्डी तसेच वैराग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .

























