Friday, September 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहरातील तरुणांमध्ये नशायुक्त पान खाण्याची क्रेझ… आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम ! जबाबदार कोण !

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा – पूर्वी प्रत्येकाच्या घरी पान खाण्यासाठी पानडब्बे असायची यामध्ये कात, चुना वापरुन साधे पान खायचे. परंतु अलीकडच्या काळात सध्या तालुक्यातील गावखेड्यापासून शहरापर्यंत तरुणाई मध्ये ‘फुलचंद पान’ खाण्याचा नवीन ट्रेंड आला असून मोठ्या प्रमाणावर नशायुक्त पान खाण्याची क्रेझ तरुणांमध्ये वाढत चालल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गावागावात सर्रास पानटप-यांवर खुलेआम नशायुक्त पानाची विक्री होत आहे. तर या पानांमध्ये सुगंधी सुपारी, कात, चुना अन् अज्ञात नशीली रासायनिक पदार्थ बेसुमार मिसळले जाते असल्याने एक पान खाल्याने एका ‘बाटली’ची नशा येते असे पान खाणारे सांगत आहेत. याचा दुष्परिणाम कोणी गुंग होतय, कोणी डोक धरतय, मळमळ, घाम फुटतो, उलट्या, चक्कर येणे अशा समस्या जाणवत आहेत. पहिल्यांदा पान खानारा तर विचारुच नका तो परत नावपण घेणार नाही इतकी बेजारी होतेय.अन् सवय लागली की तरुणाई आहारी जात आहे. नियमित सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वत्र प्रशासनाच्या नाकावर टिच्चून फुलचंद पानांची खुलेआम विक्री होत आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसल्याने तरुण पिढी आहारी जात असल्याचे करमाळा तालुक्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय? असा संतप्त सवाल तालुक्यातील जनतेतून उपस्थित केला आहे.

गावखेड्यापासून शहरांपर्यंत सगळीकडे सध्या सर्व शाळकरी मुले तरुण, नागरीकांमध्ये फुलचंद पानाची क्रेझ निर्माण झाली आहे. फुलचंद, पंचरत्न, नवरत्न व 120, 300 बनारस व कलव हे नशेली पानांचे प्रकार आहेत. या पानांमध्ये नशेली पावडर टाकली जाते असा संशय अनेकांनी व्यक्त केला असून याच्या एका पानात दारूच्या बाटली इतकी नशा आहे. हे फुलचंद पान खाणारे तरुण सांगत आहेत. या पानांमध्ये किमाम व तंबाखू वापरली जाते. किमाम तोंडात फिरतोय तस् खाणारा पण फिरतोय.

पानात कोलीन आणि तंबाखूत निकोटीन असल्याने सहन नाही झाले तर छातीत दुखायला लागते. यामुळे कॅन्सर चा धोका वाढतो दात दुखणे, हिरड्या सुजणे, यासह अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे.आजकाल फुलचंद खाल्ले की चक्कर येऊन जमिनीवर बसायला लावतात. आता पानटपरी वाले पण सगळ्यांना एकच प्रकारे कडक बनवलेले पान देतात अगोदर मागितल्यानंतर पान बनवायचे. सर्व एकदाच बनवून दिले जाते पण ज्याला झेपत नाही तो ‘तारे मोजतोय’ खायला मज्जा वाटते पण एकदा सवयी लागली की लागली की दररोज आहारी जातोय. या फुलचंद पानामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा आणि धुंदी येणारा गांजासारखा पदार्थ मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचे अनेकजण सांगतात. हे पान खाण्यासाठी शहरी भागांतील अल्पवयीन मुलांसह ग्रामीण भागांतील मुलांमध्ये क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. काही विद्यार्थीही या पानामुळे व्यसनाधीन झालेले दिसत आहे. या नशायुक्त ‘ फुलचंद पाना’ची अगोदर १० रूपये व आता १५ रुपये इतकी किंमत असल्याची माहिती मिळत आहे. एखाद्या तरुणाने पहिल्यांदा हे पान खाल्ले तर त्याला मळमळ, उलट्या व चक्कर येते. तर विडा खाणाऱ्या तरुणांच्या पालकांना केवळ मुलाने पानच खाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तो पालकांच्या नजरेतून वाचत चालला आहे.

आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम 

फुलचंद या नशायुक्त पानांचे पहिल्यांदाच जर एखाद्याने सेवन केले तर तो त्याला मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, नंतर या पानाची चटक लागल्याने त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होतो. नियमित सेवन केल्यास इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

आजकाल ‘फुलचंद पाना’ची क्रेझ वाढत असून पान खाल्ले की यापासून दुष्परिणाम होताना दिसत आहेत. भविष्यात याचा धोका वाढू नये तरुणांच्या ऊज्वल भविष्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने माहिती घेऊन त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाईची बडगा उगारला जात नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन या प्रश्नांवर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Post Views: 279
Previous Post

महापालिकेतील सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांची निर्दिष्ट कामासाठी नियुक्ती

Next Post

 श्री कमलाभवानी चरणी भक्तांकडून देणगी अर्पण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

 श्री कमलाभवानी चरणी भक्तांकडून देणगी अर्पण

ताज्या बातम्या

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1257896

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!