वैराग – बार्शी तालुक्यातील कांदा पुर्नलागवड हंगाम नुकताच संपला आणि यंदाच्या हंगामात काहीतरी विलक्षण घडलं. पानी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’मध्ये सामील महिला शेतकरी गटाने एक खास बदल अनुभवला आहे. पूर्ण हंगामात, त्यांनी एकत्र येऊन ‘इर्जीक’ पद्धतीने कामे करत आहेत. म्हणजे अशी पद्धत ज्यात प्रत्येक शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन विनामूल्य श्रमदान करतो, एका टीमप्रमाणे काम करतो.
इर्जिकमुळे ८ गटांनी तब्बल रु. १९ लाख ३७ हजारांची एकूण मजूरी खर्चात बचत केली आहे
धानोरे गावच्या यमाई देवी महिला शेतकरी गटात ११ महिलांनी प्रत्येकीच्या दोन एकर शेतात कांदा लागवड झाली आहे. फार्मर कप पूर्वी, मजुरी खर्च सुमारे ₹१३,०००/एकर होता. पण आता एकमेकींच्या शेतात आवडसावडीने काम करून, त्यांनी तो खर्च शून्य केला आहे. असे करत एकूण २२ एकरांवर तब्बल ₹२,८६,०००ची बचत झाली आहे.
अगदी हेच चित्र आहे मुंगशी आर गावात. तिथल्या कृषीशक्ती महिला शेतकरी गटाने तब्बल ₹२,६४,००० वाचवले आहेत.हाच अनुभव तालुक्यातील इतर ६ शेतकरी गटांनाही आला असून, त्यांनी मिळून तब्बल रु. १९ लाखांची बचत साधली आहे.
यमाई देवी महिला शेतकरी गटातील रेणुकाताई चव्हाण सांगतात, “शेतीत नफा कमी, खर्च जास्त—हीच आमची नेहमीची हकीकत राहिलीय. पण आता आमचा उत्पादन खर्च निम्म्याने कमी झालाय. यामुळे खूप मोठी बचतही होते आणि आम्ही सगळ्या मिळून शेती करण्याचा आनंद दुप्पट घेतोय!” यामध्ये तालुक्यातील या महिला शेतकरी गटांनी सहभाग घेतला असून हे गट पुढीलप्रमाणे आहेत
यमाई देवी शेतकरी गट, धानोरे अन्नदाता महिला शेतकरी गट, शेळगाव (आर ) ,कृषी शक्ती महिला शेतकरी गट, मुंगशी (आर )रणरागिनी महिला शेतकरी गट, कुसळंब दत्त महिला शेतकरी गट, कुसळंब
श्रीमान महिला शेतकरी गट, चुंब कृषी कन्या महिला शेतकरी गट, पिंपरी (आर ) निळकंठेश्वर महिला शेतकरी गट, ढेंबरेवाडी या महिला शेतकऱ्यांनी एकमेकीच्या शेतात जावून कांदा लागवड केली आहे .
फोटो

















