सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.महादेव बिराजदार रा. शिरवळ याचा सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांचा खासदार प्रणितीताई शिंदे,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार,दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्या उपस्थितीत जनवात्सल्य निवास सोलापूर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यामध्ये प्रवेशकर्ते- महादेव बिराजदार यांच्यासह चिदानंद शावळ,महादेव पुजारी,चंद्राम जनगोंडे, अजय बिराजदार, राहुल हिप्परगी, रविकांत बिराजदार ,रविकांत डम्मे,सचिन करके, यल्लाप्पा हिप्परगे, नागेश तुळजापुरे, शाहीर निक्केवार आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी महादेव बिराजदार म्हणाले आम्ही सर्व कार्यकर्ते आज देशाचे नेते राहुलजी गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करु असे म्हणाले.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भीमाशंकर जमादार,जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, तालुका सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष मौलवी शेख,अकबर शेख, लखन चव्हाण,शिवानंद बहेरमठ, जीवनकुमार वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















