पुणे – मराठी रंगभूमीवरील विक्रमवीर हास्य सम्राट अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतेच 16 नोव्हेंबर रोजी पुण्यात बाल गंदर्व रंग मंदिरात आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील विक्रमी 13,333 वा प्रयोग सादर केला.
यावेळी चंद्रकांत पाटील व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे उपस्थित होते. यावेळी प्रयोगाच्या मध्यंतरात दोन्ही मंत्रण्याच्या हस्ते प्रशांत दामले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 13,33,333 रुपये चा धनादेश मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी दिला.
यावेळी सोलापुरातील प्रसिद्ध नाट्य वितरक उपरे ब्रदर्स चे लक्ष्मण उपरे व शिवाजी उपरे यांनी उपस्थित राहून सोलापूरच्या नाट्य रसिकांच्या वतीने सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगा चटणी देऊन सन्मान केला.
यावेळी प्रशांत दामले यांनी सोलापूर रसिकाचे आभार मानले व लवकरच सोलापुरात त्यांच्या सध्या सर्वत्र गाजत असलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले.



















