पंढरपूर – महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर शहरालगत असणाऱ्या चिंचोली भोसे आणि इसबावी येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या कटरच्या साह्याने कापून नष्ट करण्यात आल्या आहेत.
महसुल प्रशासनाकडून गुरुवारी (दि.२०) ही तोडक कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, पंढरपूर मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, संजय खंडागळे, गणेश पिसे यांनी केली आहे.

















