Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साहिल कबीर पाचव्या प्रा.फकरुद्दीन बेन्नूर स्मृती सन्मान 2025 चे मानकरी!

तरुण भारतbyतरुण भारत
November 25, 2025
in social
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अल्पसंख्य, वंचित  तसेच परीघाबाहेरील समाज घटकांच्या जगण्यातील अगतिकता, कोंडमारा व त्यांच्याकडे पाहण्याचा समाज, शासन-प्रशासनाचा दृष्टिकोन यांचं यथार्थ चित्रण उभे करणारे तरुण लेखक म्हणून साहिल कबीर यांची ओळख आहे. त्यांना यंदाचा “प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता स्मृती सन्मान -2025 “जाहीर झाला आहे.

२३ नोव्हेंबर २०२५ला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवड समितीचे पदाधिकारी डॉ. मुस्तजीब खान , डॉ. युसूफ बेन्नूर, कलीम अज़ीम, सरफराज अहमद, प्राचार्य फारुख शेख, रेणुका कड,  उल्हास वेदपाठक इत्यादी हजर होते. 

या स्मृती सन्मानाचे स्वरूप  पंधरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकांचा संग्रह असे असेल.

कुरुंदवाड येथील रहिवासी असलेले साहिल कबीर महाराष्ट्रातील प्रतिथयश कवी आहेत. ललित लेखक, कथाकार व नाट्यलेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कविता विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांची एकूण ५ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात ‘फॉर्मलेस’ (२०१७), ‘सविनय अस्वस्थ’ (२०१८), ‘कथागत’ (२०१९) ‘मी जयूराणा’ (२०२२) ‘सोलोकोरस’ (लघु कथन संग्रह) (२०२२) ‘फ्यूजनकन्फ़युजन’ (कवितासंग्रह) २०२५ इत्यादी.

त्यांचा मराठी मुस्लिम समाजाची गेल्या ३० वर्षातील मानसिकतेविषयीचा रिपोर्ताज (महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भागातून मुलाखती) लवकरच प्रकाशित होत आहे.  ‘मुक्तशब्द’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘साधना’ वगैरे नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा, कविता, लेख व स्फुटलेखन प्रकाशित झालेले आहे. तसंच ते वृत्तपत्रांमध्येही स्तंभलेखन करतात.  

‘कल्चरल इनइक्वालिटी’ (लेखक : निळू दामले) पुस्तकासाठी दक्षिण महाराष्ट्रातील मुस्लिम वंचित अल्पसंख्य संदर्भात ग्रामीण भागातील एकंदर बदलांचा धांडोळा घेणारे लेखन सहकार्य त्यांनी केलं आहे.

लेखनाशिवाय ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. सांगली, कुंरदवाड परिसरातील स्थानिक युवकांमध्ये जाणिव-जागृतिसाठी सातत्याने काम करतात. मिरज दंगल, कोल्हापूर महापूर, कोविड साथीचा प्रकोप अशा संकटकालीन काळात तरुणांसमवेत फूड चेन सारख्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनात सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विशाळगड आणि सातत्याने घडवल्या जाणाऱ्या भयप्रद स्थितीविषयक सत्यशोधन अहवाल, आंतरधार्मिक सहसंवाद इत्यादी उपक्रम ते राबवितात. 

त्यांनी ‘मिट्टी’, ‘नो वन कील थॉट्स’ या शॉर्ट फिल्म्स तयार केलेल्या आहेत. या फिल्सना राज्य पुरस्कार  लाभलेले आहेत. शिवाय ‘नाळबंध’ या लघुपटाचे लेखन व त्यात अभिनयही त्यांनी केला आहे.

व्यवसायाने शिक्षक असून स्पीड एज्यूकेशन इन्स्टिट्यूट ही महाविद्यालयीन विद्यार्थींसाठी खाजगी कोचिंग संस्था चालवितात. सूत्रसंचालन व निवेदन त्यांची आवड आहे. कंटेंट रायटिंग आणि व्हॉईस ओव्हरमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. त्यांना राज्यातील अनेक संस्था-संघटनांचे विविध सन्मान व पुरस्कार लाभलेले आहेत.  

निवड समिती साहिल कबीर यांच्या सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. अशा हरहुन्नरी कलावंताला हा सन्मान देण्याचं समितीने सर्वसंमतीने निश्चित केलं आहे. त्यांना हा सन्मान लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. त्याविषयीची स्वतंत्र घोषणा होईल, असे समितीकडून या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.

Post Views: 132
Previous Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषेत समन्वय असावे- जनार्दन वाघमारे

Next Post

अर्धनारी नटेश्वरला दुहेरी मुकुट स्पर्धेत किरण स्पोर्टस्‌‍ व वाडीकुरोली उपविजेते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अर्धनारी नटेश्वरला दुहेरी मुकुट स्पर्धेत किरण स्पोर्टस्‌‍ व वाडीकुरोली उपविजेते

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952267

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697