Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

त्रासदायक असलेला रात्री बेरात्रीचा पाणीपुरवठा बंद करा; नागपूरच्या बैठकीतून आयुक्तांना आदेश 

तरुण भारतbyतरुण भारत
December 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रात्री बेरात्री होणाऱ्या पाणीपुरवठामुळे महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तत्काळ रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा शहराला दोन दिवसात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा. महापालिका अधिकाऱ्यांना सोलापूर शहराविषयी आत्मीयता आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत महापालिकेला लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूर येथील बैठकीत दिले.

     नागपूर येथे विधानसभा अधिवेशनादरम्यान उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी तसेच पत्रकारांची महत्त्वाची बैठक घेतली. सोलापूर महापालिकेच्या संदर्भातील पाणी प्रश्नासह विविध विषयांवर चर्चा झाली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या विविध प्रश्नांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तोफिक शेख, गणेश पुजारी आदी उपस्थित होते.  महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे  हे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. तसेच महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, सहायक संचालक नगररचना मनीष भिष्णूरकर, उपअभियंता शशिकांत वाघमारे, जयंत वाणी, योगेश डोके, राजकुमार पाटील , दिलीप पवार, सचिन पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

       या बैठकीत सोलापूरच्या पाणी प्रश्नावर अण्णा बनसोडे यांनी विचारलेल्या  प्रश्नावर अधिकाऱ्यांनी किस पाडला. तर सोलापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची मागणी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी केली. तसेच नगरअभियंता आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता यांना बदलून शासनाचे अधिकारी देण्याची मागणीसुद्धा डोंगरे यांनी केली.  महिलांसाठी त्रासदायक ठरणारा रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, किसन जाधव आणि तौफिक शेख यांनी केली.

     सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा कसा करता येईल या संदर्भात आरोग्य अभियंता चौबे यांना बनसोडे यांनी विचारले. त्यावर समाधानकारक उत्तर शोभे यांना देता आले नाही. यामुळे पंचवीस वर्षे सेवा करूनही तुम्हाला शहराविषयी आत्मीयता आहे की नाही अशा शब्दात सुनावले. सोलापूरचा रात्रीचा पाणीपुरवठा बंद होऊन सुरळीत होणार असेल तर सोलापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे देण्याचा विचार करणार नाही,असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले 

नगर अभियंता आकुलवार यांना धारेवर धरले

रमाई आवास योजने संदर्भात बोलताना ‘शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांना तिथे बसविले असून योजना नागरिकांपासून वंचित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना तिथे बसविले नाही ‘ या शब्दात या बैठकीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूर महापालिकेच्या नगरअभियंता सारिका आकुलवार यांना धारेवर धरले. रमाई आवास योजनेचे अर्ज प्रलंबित ठेवू नका. लोकांना लाभ मिळू द्या, असे आदेश अण्णा बनसोडे यांनी दिले. 

दीड वर्षात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणार : आयुक्त सचिन ओम्बासे 

या बैठकीत रात्रीचा पाणीपुरवठा बंद न करता त्याची वेळ कमी करण्याचा शब्द सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिला तर मनपा आयुक्त सचिन ओम्बासे यांनी दीड ते दोन वर्षात सोलापूरकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिली. दरम्यान या बैठकीत सोलापूरच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल : अजित पवार

दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी आवश्यक निधी या सह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त यांना फोन लावला. सोलापूरचा पाणी प्रश्नासाठी लागणारा आवश्यक निधी तसेच इतर प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी आयुक्तांशी बोलताना दिली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर यात्रेपूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करा 

मनपा परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मास्तर यांनी श्री सिद्धेश्वर यात्रा निमित्ताने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रा जानेवारीमध्ये सुरू होत आहे. संक्रांतीच्या या सणादरम्यान शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांना दिले.

Post Views: 30
Previous Post

आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी केल्याप्रमाणी गुन्हा दाखल करा

Next Post

भाजपच्या नेते मंडळींनी सिद्रामप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेटीकडे फिरवली पाठ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजपच्या नेते मंडळींनी सिद्रामप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेटीकडे फिरवली पाठ

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678534

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697