मोडनिंब – मोडनिंब येथील नटरंग कला केंद्रातील लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. प्रमिला लोदगेकर यांनी यापूर्वी दिल्ली सह अनेक परदेशांमध्ये लावणी सादर करण्याचा कार्यक्रम भारत सरकार व राज्य शासन यांच्या वतीने सादर केला होता.
तसेच त्यांनी अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमध्ये अनेक वेळा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांकाची हॅट्रिक करून पुरस्कार पटकावला होता. तसेच मागील वर्षी त्यांना नाट्यसंगीत अकॅडमीच्या वतीने उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
प्रमिला सूर्यवंशी यांना अद्याप पर्यंत लावणी कला क्षेत्रातील वेगवेगळे 82 पुरस्कार मिळाले असून 2024 सालचा महाराष्ट्र शासनाचा संस्कृती विभागाचा लावणी संगीत बारी लावणी कलावंत म्हणून पुरस्कार राज्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व सांस्कृतीक विभागाचे डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे युवा लावणी सम्रागिनी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
















