Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माहूरगड पर्यटन विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी यासाठी आ. भिमराव केराम यांचा सरकारदरबारी पाठपुरावा

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


किनवट / नांदेड : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी श्री क्षेत्र माहूरगड पर्यटनस्थळाच्या समग्र विकासासाठी करण्यात आलेल्या ८२९.१३ कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी म्हणून राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची विशेष भेट घेऊन आवश्यक निवेदन सादर केले.


नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन अनुप्रयोग केंद्रात मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत माहूरगड पर्यटन विकास आराखड्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याने, आराखड्यास तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी आमदार केराम यांनी शासनदरबारी प्रखर पाठपुरावा सुरू केला आहे.


आ. भिमराव केराम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष विनंती
आमदार केराम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र माहूरगड हे प्रमुख शक्तिपीठ, श्री रेणुकामातेचे स्थळ, तसेच दत्तसंप्रदायाचे जन्मस्थान असून वर्षभर लाखो भाविक येथे भेट देतात परंतु विद्यमान सुविधा वाढत्या गर्दीपुढे अपुऱ्या पडतात. जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केलेला ८२९.१३ कोटी रुपयांचा भव्य पर्यटन विकास आराखडा शासनाने ६ मे २०२५ रोजी तत्वतः मान्य केलेला आहे.


आता अंतिम मंजुरी उच्चाधिकार समितीकडून देणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने, “मा. मुख्य सचिवांना आवश्यक त्या सूचना देऊन आराखड्यास अंतिम मान्यता मिळण्यास सहकार्य करावे,” अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. शासकीय पत्रव्यवहारास गती, मुख्य सचिवांची भेट घेतली सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन अधिवेशनादरम्यान आमदार केराम यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन, पर्यटक सुविधा, धार्मिक स्थळांचे संवर्धन, वाहतूक मार्ग, मूलभूत सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा संवर्धन आदी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी मुख्य सचिवांना योजना किती जनहिताची व क्षेत्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे हे स्पष्टपणे पटवून दिले व मंजुरीसाठी निवेदन दिले.

८२९.१३ कोटींचा विस्तृत मास्टर प्लॅन — दोन टप्प्यात कामे
आराखडा पुढीलप्रमाणे :
• टप्पा १ : ₹३९६.२२ कोटी
• टप्पा २ : ₹४३२.९१ कोटी
या आराखड्यात पुढील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास प्रस्तावित आहे :
• श्री रेणुकामाता मंदिर परिसर
• दत्तशिखर
• अनुसया माता स्थळ
• वनदेव मंदिर
• मातृतीर्थ कुंड
• सोनापीर परिसर
• शेख फरीद बाबा दर्गा परिसर
या सर्व ठिकाणांना समर्पक रस्ते, पार्किंग, पायाभूत सुविधा, धर्मशाळा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व पर्यटन सुविधा उभारल्या जाणार आहेत.

उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक सर्व विभागांना हजर राहण्याचे आदेश
नियोजन विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार (क्र. तीक्षेवि-२०२५/प्र.क्र.३३/का.१४४४-अ) मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली असून वित्त, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आदी प्रमुखांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
माहूरगड विकास—प्रदेशातील आर्थिक प्रगतीस नवी चालना
आमदार केराम यांच्या म्हणण्यानुसार—
• आराखडा मंजूर झाल्यास नांदेड, किनवट, माहूर परिसरातील पर्यटन वाढ,
• नवीन रोजगारनिर्मिती,
• स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना,
• परिवहन व संपर्क व्यवस्था सुधारणा,
• आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधांची निर्मिती होईल.
आमदार केराम : “माहूरगडच्या विकासाची लोकाभिलाषा लवकरच पूर्ण होईल” आमदार भिमराव केराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “माहूरगडचे सर्वांगीण व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून रूपांतर करणे ही माझीच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाची लोकाभिलाषा आहे. आराखड्यास अंतिम मंजुरी मिळावी यासाठी मी स्वतः शासनाच्या प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याशी केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या प्रकल्पाला नक्कीच न्याय मिळेल.”

Post Views: 48
Previous Post

शेतकरी बिबट्याच्या भीतीत ; संबंधित विभागाने बंदोबस्त करावे अशी मागणी

Next Post

सरपंच संघटना पंचायत समितीला लावणार कुलूप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सरपंच संघटना पंचायत समितीला लावणार कुलूप

ताज्या बातम्या

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

रुग्णांचा अर्ज आल्यावर सहायता निधीला आठ तासात मिळणार मंजुरी

April 22, 2026

अमोल शिंदे चेतन नरोटे यांच्या निलंबनानंतर पुढच्या सभेत होणार सहभागी

April 22, 2026

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या पत्नीचा सात दिवसानंतर झाला मृत्यू

April 22, 2026

पारध येथील दोन युवकांची उल्लेखनीय कामगिरी ; पोलीस व मनपा सेवेत निवड

April 22, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

April 22, 2026

१६ वर्षाखालील क्रिकेट ययाती देवकतेची झुंजार अर्धशतके व्यर्थ

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823603

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697