Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उड्डाणपूल सोडून शहराचे सर्व प्रश्न मार्गी लावले : पालकमंत्री गोरे 

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विमान सेवा, आयटी पार्क, उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी, रस्ते यासह उड्डाणपूल सोडून सोलापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. सहा महिने अवधी लागणारी 892 कोटीच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुरी प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केली. या योजनेमुळे शहरातील पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेत पत्रकार परिषदेत दिली. 

          विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी महापालिकेत आले असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे , विणा पवार , उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदींसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

       याप्रसंगी पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरच्या शहर विकास आणि महापालिकेचा संदर्भातील विविध विकास कामे आणि योजनांच्या पूर्ततेचा आढावा मांडला. महापालिकेत 154 कोटीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ केला. स्वच्छ सोलापूर हा संकल्प केला होता, त्यासाठी आवश्यक साधनेही महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. सोलापूर स्वच्छतेचे काम वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत 39 कोटीची कामे होत आहेत. महापालिकेच्या शौचालयांची स्थिती बेकार होती, ती कामेही आता मार्गी लागले आहेत. स्वीपर मशीन उपलब्ध केली असल्याने शहरातील रस्ते स्वच्छ होतील. कर्मचारी अंतर्गत रस्ते स्वच्छतेची कामे करतील. या स्वीपर मशीनमुळे महापालिकेचे दरमहा आठ लाख रुपये वाचणार आहेत.

        सोलापूर शहरात तीनही आमदार शहर विकासाची भूमिका घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम आहे. जे जे मागितलं ते ते मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. प्रत्येक प्रश्न मार्गी लागला. उड्डाणपूल सोडून शहराच्या विकासाची सर्व विषय आणि प्रश्न मार्गी लागले आहेत. उड्डाणपुलाचे काम ही तडीस नेण्यात येणार आहे. विमानसेवा हा सोलापूरच्या अस्मितेचा विषय होता. ती ही सुरू झाली. अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. काही लोकांनी गॅरंटी दिली होती मात्र ही विमानसेवा आजही चांगली सुरू आहे. लवकरच बेंगलोर आणि तिरुपतीची विमान सेवा चालू होईल, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

         उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. आता रोज पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. 40 वर्षांपूर्वीच्या या जुन्या जलवाहिनी आहेत. नव्याने सर्व अंतर्गत जलवाहिन्या टाकाव्या लागतील. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. तातडीने 892 कोटीच्या योजनेला त्यांनी मंजुरी दिली. जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार  असून 200 कोटीचे बाँड काढण्याचा प्रस्तावही दिला. जी प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण होणार होती, ती प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात यशस्वीपणे राबविली. या योजनेचे निवडणुकीपूर्वीच टेंडरही निघाले आहे. यामुळे पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्याचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. 

        सोलापूर शहरातील बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी आयटी इंडस्ट्री आली पाहिजे. त्यासाठी आयटी पार्कचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. अशा पद्धतीने शहराचे छोटे-मोठे प्रश्न सुटले आहेत. शहर विकासासाठी सर्व गोष्टी केल्या आहेत.  सोलापूरच्या जनतेने भाजपाला भरभरून प्रेम दिले. शहरात तीन आमदार निवडून दिले आहेत. सोलापूरच्या अपेक्षापूर्तीसाठी सर्व योजनांची अंमलबजावणी आम्ही केली आहे. भाजपा आणि भाजपचे तीनही आमदार यांनी सर्व आश्वासने पूर्ण केले आहेत. जनतेच्या आशीर्वादाची उतराई करण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपच्या पाठीशी उभे राहील. झोळी भरून आशीर्वाद देईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

           892 कोटीची शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा योजना कमी वेळात गतीने मार्गी लावली. याबद्दल महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदारांचे आभार मानले. प्रारंभी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी महापालिकेने राबविलेल्या विविध योजना आणि कामांचा सविस्तर आढावा मांडला. महापालिकेच्या वतीने 140 विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. मिळकतीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विविध नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध आहेत यासह विविध कामांची माहिती दिली. 

सोलापूरसाठी ज्या घोषणा केल्या 

त्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या : आ. सुभाष देशमुख

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, 2014 पासूनचा कार्यकाळ पाहता शहरातील विविध कामे मार्गी लागली. आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही योजना अथवा कामाला कधी नकार घंटा वाजवली नाही. सकारात्मकपणे ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केले आहेत. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून विमानसेवा, आयटी पार्क मंजूर करून घेतले. शहराचा पाणी प्रश्न ही मार्गी लागत आहेत. शहराला सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यानंतर आता 892 कोटीच्या योजनेमुळे तोही प्रश्न मार्गी लागेल. पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त हे एकाच गावचे असल्याने आयुक्तांवर विशेष प्रेम आहे. तुमची जोडी कायम राहो. पालकमंत्र्यांचे साताऱ्यापेक्षा सोलापूर कडे विशेष लक्ष आहे. सोलापुरातील वृत्तपत्रात ज्या ज्या समस्या मांडल्या जातात त्या प्रशासनाने सोडवाव्यात. रोजगार देणारे सोलापूर व्हावे, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

महापालिका आयुक्तांचे केले कौतुक 

सोलापूर शहरातील स्वच्छता शौचालय यास इतर योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चांगली जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनीही चांगले काम केले. याबद्दल महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले.

Post Views: 145
Previous Post

प्रभाग‎ क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक‎ हक्काचे‎ स्वप्न साकारणार 

Next Post

सम्राट अशोक शिक्षण संकुलात क्रीडा सप्ताहाचा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सम्राट अशोक शिक्षण संकुलात क्रीडा सप्ताहाचा

ताज्या बातम्या

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026
सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253223

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!