श्रीपूर – बोरगांव ता . माळशिरस येथे सध्या दिवसा चोरांची तर रात्री बिबट्या सदृश प्राण्याची दशहत असल्याचे दिसून येते .
मंगळवार दि . १५ डिसें. रोजी बोरगांव हद्दी मध्ये येत असलेल्या बोरगांव – जांबूड रोड लगत असलेल्या सिताराम सुखदेव घळके यांच्या घराचे दिवसा दुपारी १२. ३० वा चे सुमारास चोरट्यांनी सिताफीने घराला लावलेले कुलूप काढून मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटणा घडली आहे यामध्ये सुमारे लाख रु चे वर चांदीचे ऐवज व रोख १० हजार रु . चोरट्यांनी लंपास केले आहेत .
विशेष म्हणजे काही दिवसा पूर्वी यांचे दारातील शेळ्याही चोरीनी पळवळ्या होत्या .
घळळे कुटूंब सकाळी रानातील कामे करण्यासाठी घराला कुलुप लावून गेलेले होते . संध्याकाळी कामे आटपून ते घरी परतले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले आत पाहता चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पसरून लॉकर मध्ये असलेले चांदीचे दागीने व रोख १० हजाराचा ऐवज लांबविलेचे घळके यांचे लक्षात आले . विशेष म्हणजे बोरगांव – जांबूड या रस्या लगत घर असल्याने वाहतुकीची वर्तळ ही असते दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने चोरी होत असल्याने चोरांची दहशत दिसून येते . या घटने मुळे पोलिस यंत्रणेस चोरांचे उच्चाटन करणेचे आव्हान आहे .
तर जंबूड येथिल बापू कचरे (पोस्टमन ) यांचे दारात बांधलेले शेळी बिबट्या सदृश प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली आहे
सकाळी बापू कचरे झोपेतून उठल्या नंतर घराचे बाहेर आल्यावर त्यांना शेळी गतप्राण झालेली दिसून आली ती दावणीला बांधेलेल्या अवस्थेत . निम्याच्या वर तिचा फडशा पाडण्यात अला होता . या घटनेते सर्व गावात भितीचे वातवरण आहे .
एकूणच या परिसराचा विचार करता चोरांची दिवसा तर रात्री बिबट्या सदृश प्राण्यांची दहशत दिसून येत आहे .
जांबूड परिसरात सध्या बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर असल्याचे व हा हल्ला बिबट्याचाच सदर घटने वरून दिसून येते अशी वन अधिकारी यांनी सांगितले तरी नागरिकांनी रात्री अपरात्री एकटे फिरू नये स्वतः बरोबर जनावरीची काळजी घेणेचे आवाहन सरपंच स्वाती राहूल खटके व उपसरपंच विश्रांती वसंत कचरे यांनी केले आहे .
फोटो :
बिबट्या सद्दश प्राण्याने शेळीची केलेली शिकार तर
दुसऱ्या छायाचित्रात घळके यांचे फोडलेले कपाट .
.
















