अक्कलकोट – शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील कुंभार गल्ली येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या बोअरची दुरुस्ती करण्यात आली आहे. या प्रभागाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष महेश मालक इंगळे यांनी स्वखर्चाने हा बोअर दुरुस्त करून नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे.
माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे व नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ११ च्या कुंभार गल्ली येथील बंद असलेल्या बोअर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. आता बोअर सुरू झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटताना पाहून जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून, पाणी टंचाईच्या समस्येतून सुटका होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रथमेश मालक इंगळे, धोंडप्पा कुंभार, गंगाधर कुंभार, शरणाप्पा कुंभार, श्री योगेश कुंभार, शरणू कुंभार, विरुपाक्ष कुंभार, रेवणा कुंभार, शेखर पवार, चंद्रकांत कडबगावकर, आकाश कुंभार यांच्यासह महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 14