बिलोली / नांदेड – दर वर्षा प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या लोककलेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या लावणी महोत्सवाची सुरवात दि.२२ डिसेंबर रोजी होणार आहे.या वेळी महाराष्ट्रातील नामवंत लावणी संचाचा समावेश होणार असून यामध्ये पुरस्कार प्राप्त प्रेम कुमार मस्के व अनुराधा नांदेडकर यांच्या लावणी संचाचा समावेश करण्यात आला आहे.
सदर लावणी महोत्सवास अनुसरून विविध नृत्यागंनाच्या उपस्थितीत पिढ्यानपिढ्या मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लावणीच्या घुंगराचा नाद रसिकांच्या कानी घुमवण्यासाठी गायीका अनुराधा नांदेडकर यांच्या लावणी संचाचा सराव सुरू झाला आहे.या संचात प्रामुख्याने अल्का पुणेकर,पूर्वा पुणेकर,अंजली संभाजीनगरकर,श्रुती संभाजीनगरकर या विशिष्ठ लावण्यवतीसह नृत्यांगणा आपली कला सादर करणार आहेत.
याबाबत या संचाच्या गायीका अनुराधा नांदेडकर म्हणाल्या की,महाराष्ट्रातील माळेगाव महोत्सवासाठी प्रशासनाने पाचारण केलेल्या लावणी संचात गेल्या कांही वर्षा पासून नांदेडला संधी देण्यात येत असून यामध्ये नांदेडकरांची मान उंचावेल अशीच लावणी सादर करणार असे म्हणाल्या.



















